मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये (Pune) कोयता गँगने (Koyta Gang) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी तरुण मुलांची टोळी तोडाफोडीचे प्रकार करत आहे. आता पुण्यात कोयता गॅंगनंतर मालेगावात तलवार गँगने डोके वर काढलं आहे.
ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचा एकाच गाडीतून प्रवास
मालेगावमध्ये सात ते आठ तरुणांच्या टोळक्याने हातात तलवारी घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केलाय. यामुळे तेथील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ह कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
सामान्यांना चटका तर शेतकऱ्यांना दिलासा! गोकूळ डेअरीच्या दुधात ‘इतक्या’ रुपयांची वाढ
मागच्या काही दिवसापासून पोलीस कोयता गँगचा बंदोबस्त करत आहेत. तरीदेखील अजून कोयता गँगचा बंदोबस्त झालेला नाही. आता यामध्येच तलवार गँगचाही बिमोड करण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.
“आदित्य ठाकरे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा”, तानाजी सावंत यांचं मोठं विधान
तोंडाला रुमाल बांधून सहा ते सात जणांच्या टोळीने हातात तलवारी घेऊन शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या गँगचा शोध घेत आहे.
‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियानांतर्गत सरकारने स्वीकारले बालकांचे पालकत्व