पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच ठाणे दौऱ्यावर; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

After the party split, Uddhav Thackeray is visiting Thane today for the first time; Discussion in political circles

ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेचे ( बाळासाहेब ठाकरे) मुख्य कार्यालय देखील ठाण्यातील टेंभी नाका येथेच आहे. अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांचा नुकताच ठाणे ( Thane) दौरा पार पडलाय. दरम्यान उद्धव ठाकरे सुद्धा आज प्रजासत्ताक दिनी ठाणे दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या राजकीय बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरे ठाण्यात येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

छोटा भाईजान म्हणजेच अब्दु रोजिक झळकणार आंतरराष्ट्रीय रिऍलिटी शोमध्ये!

शिवसेना पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज (दि.26) प्रजासत्ताक दिनी ठाण्यामधील तलाव पाळी परिसरात एका शिबिराला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

सोलापूरातील भाविकांचा तिरुपतीहून येताना अपघात! चार जणांचा जागीच मृत्यू

यानंतर शिवसेनेचे ( Shivsena) दिवंगत नेते आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्धव ठाकरे आनंद आश्रमात जाणार आहेत. ठाकरे यांचा हा दौरा दुपारी 12 वाजता सुरू होणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत ते ठाण्यातच असणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे टेंभी नाका परिसरातील जैन मंदिरात देखील ते विशेष उपस्थिती दाखवणार आहेत.

मोठी बातमी! अदानी समूह संकटात; व्यापार क्षेत्रात बसला मोठा धक्का

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *