ख्वाडा व बबन या चित्रपटांच्या दमदार यशानंतर अभिनेते भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘रौंदळ’ या अगामी चित्रपटात भाऊसाहेब रांगड्या रुपात दिसणार आहे. मार्च 2023 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
के एल राहूलला लग्नामध्ये विराट कोहलीने गिफ्ट केली BMW कार! किंमत ऐकून व्हाल थक्क
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ख्वाडा चित्रपटाच्या दमदार यशानंतर भाऊसाहेब शिंदे यांना चांगलीच प्रसिद्धी भेटली होती. या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर बबन चित्रपटातील त्यांची भूमिका देखील प्रचंड गाजली.
यानंतर आता रौंदळ (Raundal) या चित्रपटाच्या निमित्ताने भाऊसाहेब पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भूमिका फिल्म्स अॅण्ड एंटरटेनमेंटच्या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली असून दिग्दर्शन गजानन नाना पडोळ यांनी केले आहे.
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचं निधन
‘रौंदळ’ मध्ये भाऊसाहेबांच्या जोडीला नेहा सोनवणे ही अभिनेत्री असणार आहे. या चित्रपटातील ‘मन बहरलं…’ हे प्रेमळ गीत काही दिवसांपूर्वीच रसिकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटात गावातील वास्तव व ग्रामीण बाज पहायला मिळणार आहे.
गाडीवर रील बनवताना शाळकरी विद्यार्थ्यांचा गंभीर अपघात; एक जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी