जगभरात मोठ्या संख्येने फेसबुक युजर्स आहेत. दरम्यान फेसबुक युजर्ससाठी फेसबुकने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेने समस्त फेसबुक युजर्सचे ‘होश’ उडले आहेत. त्याच झालंय अस की, फेसबुकच्या ब्ल्यू टिक साठी आता लोकांना पैसे मोजावे लागणार आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम व whatsapp ची मूळ कंपनी मेटाने आता प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची घोषणा केली आहे. (Facebook)
पंकजा मुंडेंचा उद्धव ठाकरेंना फोन! राजकीय वर्तुळात रंगल्या नव्या चर्चा
या प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची सुरुवात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मधून करण्यात येणार आहे. यानंतर इतर देशात याची सुरुवात होईल. फेसबुक वेब प्रीमियम व्हेरिफिकेशनसाठी आता 11.9 डॉलर्स म्हणजे 992 रुपये मोजावे लागणार आहेत, तर ioS साठी 14.99 डॉलर्स म्हणजे 1240 रुपये मोजावे लागणार आहेत. मध्यंतरी ट्विटर ने देखील ब्ल्यू पेड सबस्क्रीप्शन सेवा लाँच केली होती. मात्र फेसबुकचा प्रीमियम प्लॅन ट्विटर पेक्षा महागडा आहे.
दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावरच होणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची माहिती देणाऱ्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, ‘या आठवड्यात आम्ही मेटा व्हेरिफाईड लॉन्च करत आहोत, ही की सबस्क्रिप्शन सेवा वापरून तुम्ही तुमचे सरकारी आयडी व्हेरिफाईड करू शकाल.’ बनावट खात्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी फेसबुकच्या या सेवेचा लाभ घेता येतो. ( Premium Verification Service)
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल