मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका होते आहे. यावरून राजकीय नेत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आता याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनीदेखील माध्यमांशी बोलताना एक मोठं वक्तव्य केलं आहे.
VIDEO! अबब! खासदार महुआ साडी नेसून खेळतायेत फुटबॉल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
रोहित पवार म्हणाले,“ महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या गोष्टी अंतिम झाल्या होत्या. यामध्ये जागेची किंमत, टॅक्स आणि इतर सर्व गोष्टी अंतिम झाल्या होत्या , नंतर सरकार बदलल पण कदाचित सरकारनेही प्रयत्न केले असावेत. पण ५ सप्टेंबरला अग्रवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले आणि त्यानंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत.
याचबरोबर रोहित पवार पुढे म्हणाले, “फॉक्सकॉन प्रोजेक्टमधून महाराष्ट्रामधील जवळपास दीड लाख तरुणांची नोकरी हुकली आहे. या प्रोजेक्टसाठी महाराष्ट्रात तळेगावला जागा निश्चित झाली होती, पण आता गुजरातमध्ये ते जागा शोधत आहेत. म्हणजे इथे ताट वाढलं होतं आणि गुजरातमध्ये आता त्यांनी जेवण तयार करण्याची सुरुवात केली आहे”.
Raj Thackeray: भाजप-मनसे युतीवर राज ठाकरेंनी दिले उत्तर, म्हणाले…