
Social Media । अलीकडच्या काळात लहानांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांच्याच हातात आपण स्मार्टफोन (Smartphone) पाहतो. स्मार्टफोन फक्त ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन नाही तर कमाई करण्याचेही साधन बनले आहे. स्मार्टफोनच्या मदतीने अनेक कामे (Uses of Smartphone) चुटकीसरशी होतात. अनेक मंडळी सोशल मीडियाचा (Social media) जास्त वापर करतात. विशेष म्हणजे लहान बालकांचेही सोशल मीडिया अकाउंट असते. (Latets Marathi News)
सोशल मीडियाचा वापर जितका फायद्याचा आहे तितकाच तो तोट्याचाही आहे, यावर आता हायकोर्टाने (High Court) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला तब्बल १ हजार ४७४ खाती, १७५ ट्वीट, २५६ यूआरएल आणि एक हॅशटॅग हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ३९ यूआरएलच्या संदर्भात आदेशाला ट्विटरने उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. (High Court on Social Media)
या याचिकेवर कर्नाटक हायकोर्टाने एक्स कॉर्पला ५० लाखांचा खर्च देण्याचा आदेश दिला असून मद्यपान करण्यासाठी जशी वयोमर्यादेची अट असते, तशी अट सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे. सरकारने त्याबाबत विचार करायला हवा, अशी टिप्पणी कर्नाटक हायकोर्टाने केली आहे. त्यामुळे आता सरकार कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Crime News । चक्क प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून 2 किलो सोन्याच्या पेस्टची तस्करी, दोघांना अटक