छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Aavhad) वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ‘औरंगजेब, अफझलखान आणि शाहिस्तेखान आहेत, म्हणून शिवाजी महाराज आहेत.’ असे ते म्हणाले होते. या विरोधात भाजप नेते आक्रमक झाले असून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, ‘जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस देण्यात येईल’ अशी घोषणा सुद्धा करण्यात आली आहे.
लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरे भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाले…
जालना येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यानंतर भाजपा ( BJP) ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी माध्यमांशी बोलताना मोठी घोषणा केली आहे. ” महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी आवाहन करतो की, जितेंद्र आव्हाड जिथे दिसतील, तिथे त्यांची जीभ छाटावी. जो त्यांची जीभ छाटेल त्याला १० लाख रुपयांच बक्षीस देण्यात येईल,” असे दहेकर यांनी घोषणेमध्ये म्हंटले आहे.
मोठी बातमी! राखीकडून आदिलच्या गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट; फोटो देखील झाले व्हायरल
महाराष्ट्र सन्मान परिषदेमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. यावेळी ते म्हणाले होते की एमपीएसीच्या अभ्यासक्रमामधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला आहे. एके दिवशी तावडेंनी विधानसभेत सांगितले की, आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हटलं की, मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब, अफजलखान आणि शायिस्तेखान आहेत. म्हणून, शिवाजी महाराज आहेत. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवत होते हे जगासमोर आहे.
मोठी मुलगी पायलट तर आता अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचीही कौतुकास्पद कामगिरी, म्हणाल्या…