Pune : वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात पुण्यात काँग्रेसचे आक्रमक आंदोलन!

Aggressive protest of Congress in Pune against the increased GST on goods!

पुणे : देशभरात सर्वांनाच महागाईला तोंड द्यावे लागत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे. केंद्र सरकारकडून जीवनावश्यक वस्तूंवर देखील जीएसटी लावण्यात आला आहे. महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली दिसत आहे. पुण्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले आहे.

महागाईने जनता त्रस्त आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीसी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. अस असतानाच आता केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. याचसोबत शालेय वस्तूंवर तसेच रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे. यामुळे काँग्रेसने जोरदार आंदोलन केले आहे.

या आंदोलनामध्ये काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेस गटनेते आबा बागुल, काँगेस महिला आघाडीच्या कमल व्यवहारे, संगीता तिवारी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *