
राज्यात कालपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ( Maharashtra budget session 2023) सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या आमदारांना बजावला गेलेला व्हीप, सत्ताधारी व विरोधकांमधील टीका युद्ध यामुळे हे अधिवेशन चर्चेत आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर डोक्यावर कांद्याची टोपली घेऊन विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
आईच्या मृत्यूनंतर नरेंद्र मोदींना आणखी एक मोठा धक्का; कुटुंबातील ‘या’ व्यक्तीची प्रकृती गंभीर
मागील काही दिवसांत कांद्याचे दर सतत घसरत आहेत. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने देखील केली.परंतु, निदर्शने करून सुद्धा कांद्याला कसलाच भाव मिळत नाही, हे लक्षात येताच शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद पडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेने घेतला आहे.
एमसी स्टॅन लवकरच लग्नबंधनात अडकणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
अशातच कांद्याला भाव मिळावा यासाठी राष्ट्रवादीचे आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांदे घेऊन दाखल झाले आहेत. एवढंच नाही तर काही आमदारांनी चक्क गळ्यात लसूण,कापूस, कांद्याची माळ घातली आहे. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सरकारला कांद्यासारखे सोलून काढू असा इशारा विरोधकांनी दिला आहे.
हाताच्या कोपऱ्यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्याचे जालीम उपाय; वाचा सविस्तर