
बारामती मधील कृषीक प्रदर्शन ( Krushik 2023) अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. राज्यातील शेतकरी, व्यवसायिक व विद्यार्थी या प्रदर्शनाची आतुरतेने वाट बघत असतात. दरम्यान, आजपासून कृषी प्रदर्शनाला सुरवात होणार आहे. आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे कृषिप्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित असणार आहेत.
विश्वास नांगरे पाटील यांच्यासाठी धक्कादायक बातमी; कोरेगाव भीमा प्रकरणी होणार चौकशी
अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषी विज्ञान केंद्र बारामती अटल इंक्यूबेशन सेंटर मार्फत हे कृषी प्रदर्शन ( KVK) आयोजित केले आहे. दरम्यान, या कृषीक 2023 मध्ये 153 जातीच्या भाजीपाल्याची 52 पिके, शेतातील 54 नाविन्यपूर्ण स्टार्टअप, फुल शेतीची 27 पिकांचे 112 वान, स्मार्ट मशीनरीचे 108 प्रकार, १४ प्रकारचे खतांचे डेमो दाखवले जाणार आहेत. तसेच प्रत्येक प्लॉटवर माहिती देण्यासाठी बोर्ड व एक व्यक्ती देखील असणार आहे.
मोठी बातमी! बच्चू कडूंना धडकवणार आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक
एन एफ टी तंत्रज्ञान, आय ओ टी रोबोट सेन्सर आधारित स्मार्ट सिंचन, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञाची ४५ प्रात्यक्षिके, 47 जातींची फळे, 33 फळ पिकांची रोपे, विविध शेतीविषयक प्रात्यक्षिके अशा अनेक गोष्टींसह 210 कंपन्यांचे स्टॉल्स या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत.