Site icon e लोकहित | Marathi News

Agriculture News | कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

Agriculture News | Farmers angry over fall in coriander prices; Tractor turned on vertical crop

Agriculture News | शेतकऱ्यांना शेती करत असताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक गोष्टींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. मात्र यावर मात करून शेतकरी आपले पीक फुलवत असतात. मात्र जर या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहते. सध्या देखील अशीच काही स्थिती दिसत आहे. कोथिंबिरीला सध्या भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत मात्र कोथिंबिरीचा भाव घसरल्याने लातूर जिल्ह्यातील कुमठा येथील एका शेतकऱ्याने कोथिंबीरीवर ट्रॅक्टर फिरवल्याची माहिती समोर आली आहे. (Coriander prices)

Nitin Desai । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! नितीन देसाई मृत्यू प्रकरणी ‘या’ बड्या व्यक्तींवर गुन्हा दाखल

मागच्या काही दिवसापासून कांद्याला देखील भाव मिळत नाहीत त्यामुळे कांद्यावर देखील ट्रॅक्टर फिरवण्याचे प्रकार घडत होते आणि आता कोथिंबीरला भाव मिळत नसल्याने कोथिंबिरीवर ट्रॅक्टर फिरवण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मागच्या महिन्यामध्ये कोथिंबिरीला चांगला बाजारभाव मिळाला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा देखील झाला होता मात्र सध्या कोथंबिरीला भाव मिळत नसल्याने लागवड आणि वाहतुकीचा खर्च सुद्धा निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे.

Prithvi Shaw । पृथ्वी शॉच्या अडचणी संपता संपेना! पहा व्हायरल व्हीडिओ

कोथिंबीरीच्या कॅरेटला सध्या पन्नास रुपये दर मिळत आहे. त्यामुळे बाजारात नेण्यापेक्षा काढून टाकलेली बरी असा विचार आणि शेतकरी करत आहेत. त्यामुळेच आता भाव मिळत नसल्याने उदगीर तालुक्यातील कुमठा येथील शेतकरी अतुल केंद्रे यांनी देखील आपल्या एक एकर कोथिंबिरीवर ट्रॅक्टर फिरवला आहे.

WI vs IND 1st T20I । अर्रर्र.. पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का

Spread the love
Exit mobile version