Agriculture News । शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शेततळ्यासाठी अर्ज सुरु; ‘या’ ठिकाणाहून करा अर्ज

Application for farm started

Agriculture News । राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर शेततळ्यासाठी पुन्हा अर्ज सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून शेततळ्याचा लाभ घ्यावा असे आव्हान देखील कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा कायम असतो. कोरडवाहू तसेच खडकाळ जमीन अशा ठिकाणी शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता नसते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर उपलब्ध राहावे लागते.

Weather Update । राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक! विजांच्या गडगटांसह ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

त्यामुळे अपुरे पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न घडते. यासाठीच सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण करून देणाऱ्या या योजनेमधून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. यासाठी तुम्हाला राज्य सरकारच्या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.

फडणवीसांविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या ‘त्या’ वकिलासह ६ जणांवर कारवाई, जाणून घ्या नेमकं प्रकरण

किती मिळणार अनुदान?

शेतकऱ्यांना जर शेततळ्यासाठी अनुदान पाहिजे असेल तर शेततळ्याच्या आकारमानावरून ठरवले जाते. ही रक्कम पूर्वी 50 हजार होती मात्र आता त्या रकमेमध्ये शेततळे होत नसल्याची शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. याच गोष्टीचा विचार करून सरकारने आता यामध्ये वाढ केली असून 75 हजार रुपये करण्यात आली आहे.

Krishi Seva Kendra । घरबसल्या मिळवा कृषी सेवा केंद्रासाठी परवाना, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

पात्रता काय?

शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर कोणत्याही शासकीय योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोणत्याही अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांनी घेतलेला नसावा. त्याचबरोबर ज्या जमिनीवर शेततळे बांधायचे आहे ती जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे गरजेचे आहे.

Bigg Boss Ott Season 2 Winner | एल्विश यादव ठरला बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचा विजेता

या ठिकाणी करा अर्ज?

तुम्हाला जर शेततळ्यासाठी अर्ज करायचा असेल तर राज्य सरकारच्या महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. शेततळे योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.

Bigg Boss Ott Season 2 Winner | एल्विश यादव ठरला बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचा विजेता

आवश्यक कागदपत्रे

  • जमिनीचा सातबारा आणि ८ अ उतारा
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • हमीपत्र आणि जातीचा दाखला
Spread the love