Agriculture News | आपल्याकडे बरेच जण फळ पिकांची शेती करताना दिसून येत आहेत. या शेतीतून चांगला नफा देखील राहतो असे लोकांचे म्हणणे आहे. मात्र नफा राहत असला तरी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना देखील करावा लागतो, दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, चांदूरबाजार, वरुड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर विदर्भामध्ये देखील संत्र्याचे उत्पादन घेतले जाते मात्र आता संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असल्याचे चित्र दिसत आहे.
Gadar 2 । बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ ची जादू, पहिल्याच दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला
फळ गळती सुरू असल्याने शेतकरी चिंतेत
शेतकरी आपले कोणतेही पीक असो तो अगदी पोटच्या लेकरासारखं त्या पिकाला जपत असतो. त्यातून जर चांगलं उत्पन्न निघाले तर शेतकऱ्याला देखील त्याचा चांगला आर्थिक फायदा होत असतो. पण सध्या संत्र्याच्या झाडाची फळगती सुरू झाल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एकीकडे शेतकरी अडचणी सापडले असताना दुसरीकडे कृषी विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगती होत आहे यासाठी शेतकऱ्यांनी अनेक उपाययोजना देखील केल्या आहेत. औषध फवारणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र कृषी विभाग याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर कृषी विभागाने आम्हाला यासाठी काहीतरी मार्गदर्शन करावे असे देखील शेतकरी म्हणत आहेत.
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! आता लॉटरी पद्धतीने नाही तर सर्व अर्जदारांना मिळणार शेततळे
सरकारने मदत जाहिर करावी
शेतकऱ्यांनी फळबागेसाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे मात्र हंगामापूर्वीच बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी बागायतदारांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने ठोस मदत जाहीर करावी अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे.