Agriculture News । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार कुकडीचे आवर्तन

The rotation of the hen will continue till September 10

Agriculture News । सध्या राज्यभर पावसाने दडी मारली आहे. यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जत आणि जामखेड तालुक्यांमध्ये देखील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांची पाण्याची गरज आणि अडचण लक्षात घेता कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू आहे. मात्र या आवर्तनाची तारीख वाढवण्यासाठी काही दिवसापूर्वी आमदार रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन तारीख वाढवण्याबाबत विनंती केली होती. दरम्यान आता याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

Baramati News । ‘सरकारचा भरलाय घडा अजित दादा सरकारमधून बाहेर पडा’; बारामतीमध्ये मराठा आंदोलकांच्या तुफान घोषणा

दोन सप्टेंबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली असून यामध्ये आमदार रोहित पवार यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या 10 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांसाठी आवर्तन सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण की, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सर्वात महत्त्वाचे मानले जाते.

Maratha Reservation । मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार का? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

कर्जतमधील जवळपास 54 गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी कुकडी डाव्या कालव्यावर अवलंबून आहेत. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे त्यामुळे पाण्याची पातळी खालावल्याने पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. या दृष्टीने हे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.

Drink Before Brushing Teeth । सकाळी ब्रश न करता पाणी पिणे कितपत फायदेशीर? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Spread the love