Ahmednagar Accident । अहमदनगमध्ये बस आणि इर्टिगा गाडीचा भीषण अपघात; ४ ज्यांचा जागीच मृत्यू

Ahmednagar Accident

Ahmednagar accident । ओव्हरटेक करण्याच्या नादात अनेकदा भीषण अपघात झाल्याचे आपण पाहिले आहे. सध्या देखील अहमदनगरमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि इर्टिगा गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. इर्टिगा गाडी आणि श्रीगोंदावरून शिरूरला जाणाऱ्या एसटी बस मध्ये भीषण अपघात झाला आहे.

KPK Jeyakumar । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! काँग्रेस नेत्याचा मृतदेह आढळला जळालेल्या अवस्थेत

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांचा रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस, विठ्ठल गणपत डोके, रोहिदास हरिभाऊ सांगळे अशी या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

Rohit Pawar News । रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का; कट्टर समर्थक करणार अजित पवार गटात प्रवेश

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये चार चाकीचा संपूर्ण चुराडा झाला आहे. त्याचबरोबर एसटी बसचे देखील मोठ नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये एसटी बस मधून प्रवास करणारे 16 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Crime News । बदमाशांनी त्याला द्रव पाजले, इंजेक्शन दिले… कॉन्स्टेबल विशाल एकटाच लढत राहिला, 3 दिवसांनी घडलं भयानक

Spread the love