Ahmednagar Accident News । बसचे अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवसे वाढत चालले आहे. यामुळे अनेक प्रवाशांना आपला जीव देखील गमवावा लागतो. चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा अन्य काही कारणामुळे बसचे अपघात हे होतच आहेत. सध्या देखील अहमदनगर जिल्ह्यातून बस अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. अहमदनगरमधील संगमनेर या ठिकाणी घटना घडली आहे.
Kerala Bridge Collapse । केरळमध्ये ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान पूल कोसळला, अनेकजण जखमी
प्रवाशांनी गच्च भरलेली ही बस राहुरीकडून संगमनेरकडे निघाली होती. यावेळी रस्त्यातच बसचे एक्सेल तुटले आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात बस पोहचली त्यावेळी हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आह. सध्या जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
सकाळी विद्यार्थ्यांना लवकर शाळा असते त्यामुळे गावातील अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी निघाले होते. बस अपघाताची माहिती मिळतात मुलांच्या पालकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. या अपघातामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.