
Ahmednagar Crime News । घराच्या जागेवरून किंवा शेत जमिनीच्या जागेवरून शेजाऱ्यांमध्ये नेहमीच भांडण होत असतात. हे भांडण कधी कधी जीवावर देखील बेततात. सध्या देखील अहमदनगरच्या पारनेर (Parner) शहरांमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घराच्या जागेवरून झालेल्या वादामध्ये माय-लेकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Ahmednagar Crime News)
Politics News । 31 डिसेंबरपर्यंत शिंदे सरकार पडणार, बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ
पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारनेर परिसरामध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबीयांमध्ये घराच्या जागेवरून वाद सुरु होते. या दोन्ही कुटुंबीयांमध्ये नेहमीच खटके उडत असत. कायम त्यांच्यामध्ये जागेवरून भांडण सुरू असत. मात्र गुरुवारी या वादाने टोक गाठलं आणि यामध्ये दोन जणांचा जीव गेला आहे. (Latest Marathi News)
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आरोपीने अडीच वर्षाच्या चिमूरड्यावर गाडी घातली यामध्ये चिमुरड्याचा आणि त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महिलेच्या सासूने तक्रार दाखल केली असता याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे.
Ajit Pawar | अजित पवारांचा मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध? बड्या नेत्याने दिली कबुली