Ahmednagar Loksabha | सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अहमदनगर दक्षिण मतदार संघामध्ये महाविकास आघाडी कडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडून भाजप नेते सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र हा प्रचार सुरू असतानाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी निलेश लंके यांच्या पाथर्डी तालुक्यातील एका कार्यकर्त्याला जबर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अहमदनगर लोकसभेचे वातावरण बिघडले आहे. सचिन हांडे असं मारहाण केलेल्या कार्यकर्त्याचं नाव असून ते पाथर्डी या ठिकाणी राहतात. 18 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. या मारहाणी नंतर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
Madha Loksabha । ब्रेकिंग! माढ्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर
सचिन हांडे हे ग्रामपंचायती जवळ उभे असताना त्यांच्याजवळ दोन इसम आले आणि निलेश लंके यांचा प्रचार का करतो? असा प्रश्न केला. त्याचबरोबर सुजय विखे पाटील यांचा प्रचार कर अशी धमकी त्यांनी दिली… त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने सचिन हांडे यांच्यावर ब्लेडने वार केले. त्यानंतर हांडे यांच्याकडील नऊ हजार रुपये देखील चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.