Site icon e लोकहित | Marathi News

Ahmednagar News । अत्यंत दुर्दैवी घटना! निसर्गरम्य वातावरणात पर्यटनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

Ahmdnagar News

Ahmednagar News । राज्याच्या अनेक भागात सध्या पाऊस पडत आहे. त्यामुळे सगळीकडे हिरवळ पाहायला मिळत आहे. धबधबे, नदी, तलाव या ठिकाणी मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. याचाच आनंद घेण्यासाठी अनेक जण पर्यटनासाठी जात आहेत. मात्र सध्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आह. अकोला तालुक्यातील फोफसंडी या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Maharashtra Politics । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीचं चिन्ह गोठवलं जाणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास चार पर्यटन फोफसंडी गावाजवळ असणाऱ्या एका ओढ्या वर गेले होते. आणि यावेळी ते पाण्यात उतरले असता एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडू लागला. त्याचवेळी दुसऱ्यांने त्याला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी मारली मात्र यामध्ये दोघेही बुडाले. सध्या या घटनेने तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा तुफान राडा; हुल्लडबाजांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी केला लाठीचार्ज

आपले दोन मित्र पाण्यात बुडत असल्याचे दिसताच दुसऱ्या दोन मित्रांनी गावात जाऊन ही माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर गावकरी धावत घटनास्थळी आले आणि बुडालेल्या दोघांचा शोध सुरू केला मात्र अद्याप त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांचा मृतदेह सापडण्यास अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे.

Amravati News । धक्कादायक! वेळेत उपचार न केल्याने डॉक्टर-पेशंटमध्ये तुफान हाणामारी

या ठिकाणी मोबाईलला नेटवर्क नसल्याने ही माहिती इतर लोकांना लवकर समजली नाही. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांचा शोध सुरू केला. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत यांचा शोध सुरू असतानाच अंधार पडल्याने त्याच बरोबर जोरदार पाऊस असल्याने तपास थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Pankaja Munde । पंकजा मुंडे यांनी सांगितला मुंबईमधील धक्कादायक अनुभव!

Spread the love
Exit mobile version