Ahmednagar Politics । मोठी बातमी! अहमदनगर दक्षिण मतदारसंघात नवा ट्विस्ट

Nilesh Lanke

Ahmednagar Politics । राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वारे वाहत आहे. अशातच आता अहमदनगर दक्षिण मतदार संघात एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. या मतदारसंघामधून भाजपने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

Congress candidate list । ब्रेकिंग! पुण्यात रवींद्र धंगेकर तर कोल्हापुरात शाहू महाराज, महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मागच्या काही दिवसापासून निलेश लंके (Nilesh Lanke) हे अजित पवार गटाची (Ajit Pawar group) साथ सोडून शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन याबाबत चर्चा देखील केली आहे. मात्र निलेश लंके यांचे नाव लोकसभेसाठी जाहीर न झाल्याने आता चर्चा अजूनच वाढली आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, निलेश लंके आपल्या पत्नी राणीताई लंके (Ranitai Lanke) यांना या ठिकाणी लोकसभा उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.

Arvind Kejriwal Arrested । ब्रेकिंग न्यूज! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष बदलाच्या तांत्रिक अडचणीमुळे आमदार निलेश लंके निवडणुकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न आहेत. मात्र यामुळे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीचा पेच वाढला आहे. त्याचबरोबर निलेश लंके यांनाच उमेदवारी देण्यावर शरद पवार ठाम आहेत. त्यामुळे येत्या काळात नेमक्या काय घडामोडी घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ramdas Athawale Accident । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! रामदास आठवले यांच्या गाडीचा भीषण अपघात; कंटेनरने दिली जोरदार धडक

Spread the love