
औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांचे नवीन नामकरण नुकतेच पार पडले. मागील आठवड्यात महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यास मंजूरी दिली आहे. दरम्यान राज्यात आणखी एका शहराचे नाव बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. अहमदनगरचे ( Ahmadnagar) नाव अहिल्यानगर व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाने मागणी केली आहे. भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी आज ( ता.27) ही मागणी केली आहे.
ऊस राहतोय का काय? या भीतीपोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होतेय लूट
यावेळी ते म्हणाले की, ” उस्मानाबाद व औरंगाबाद शहरांची नावे बदलल्या बद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत. खरंतर अहमदनगर मधील चौंडी या गावात अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला. या कारणामुळे अहमदनगरचे नाव अहिल्यानगर व्हावे अशी आमची इच्छा आहे. ” विशेष म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी दुसऱ्यांदा मांडली असून याआधी देखील त्यांनी अहमदनगरच्या नामांतराबाबत महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिले होते.
सत्यजीत तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार?; स्वतःच केला याबाबत मोठा खुलासा, म्हणाले…
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी सरकार याबाबत लक्ष घालणार असल्याची माहिती दिली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, असे देखील ते म्हणाले आहेत. दरम्यान एआयएमआयएमने ( AIMIM) गोपीचंद पडळकरांच्या या मागणीचा निषेध केला आहे. त्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनात यामुळे काय फरक पडेल ? त्यांना काही दिलासा मिळेल का ? असा सवाल देखील AIMIM ने उपस्थित केला आहे.
शरद पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ जवळच्या विश्वासू नेत्याने दिला राजीनामा