
परिस्थितीला दोष न देता आहे त्यातून मार्ग काढत ध्येयाकडे वाटचाल करणारी माणसं आयुष्यात नक्कीच यशस्वी होतात. कवि अनंत राऊत म्हणतात, “होतो विजय गड्या, हा नाद पाहिजे बस्स.” अहमदनगर मधील एका मुलाने असेच परिस्थितीच्या छताडावर पाय देत मेहनतीच्या जोरावर आपला नाद पूर्ण केला आहे. अवघ्या 10 बाय 10 च्या खोलीत परिस्थितीचे चटके सहन करणाऱ्या विशाल पवार ( Vishal Pawar) याने युपीएससीच्या सीडीएस ( UPSC CDS) परीक्षेत यश मिळवले आहे.
गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर
अहमदनगरमधील ( Ahmadnagr) बुरुडगावात विशाल आपल्या आई, वडील व आजीसोबत राहतो. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची असून त्याचे वडील गवंडी काम करतात तर आई शिलाई मशीनचे काम करते. अशात सर्व शैक्षणिक सोयी उपलब्ध नसताना देखील विशालने हे यश मिळवले आहे.
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या नवीन घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
विशालने प्राथमिक शिक्षण त्याच्या गावी झाले तर माध्यमिक शिक्षण त्याने अहमदनगर येथे पूर्ण केले. नंतरच्या काळात अहमदनगरच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये विशालने मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. यानंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विशालने एका खासगी कंपनीत नोकरी करून पैसे जमा केले व पुण्याच्या काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला.
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; 205 किलो कांदा विकून हाती आले फक्त 8 रुपये!
सीडीएस परीक्षेत उत्तीर्ण होऊन विशालने आर्मीसाठी देशात टॉप 100 मध्ये 61 वा नंबर मिळाला आहे तर नेव्हीसाठी टॉप 100 मध्ये 20 वा नंबर मिळवला आहे. यामध्ये विशालने आर्मी ला निवडले असून. भारतीय सैन्यदलातील लेफ्टनंट पदावर तो लवकरच रुजू होणार आहे. डेहराडून येथे लवकरच त्याचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. विशालच्या या यशाचा त्याच्या आईवडिलांना फार अभिमान वाटतो.
दुग्धव्यवसायाला चालना मिळण्यासाठी दूध संघटनेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर