AI Death Calculator । हल्ली मृत्यूचे (Death) प्रमाण वाढत चालले आहे. काही मृत्यू गंभीर आजाराने किंवा अपघाताने होत आहेत. विशेष म्हणजे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू (Death by heart attack) होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यात तरुणांना मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. परंतु आता तुम्हाला तुमचा मृत्यू कधी होणार आहे? ते वेळेपूर्वीच समजणार आहे. AI एक भन्नाट तंत्रज्ञान (AI technology) आणलं आहे. (Latest Marathi News)
आपल्याला सध्या AI चा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने मृत्यू (Death Calculator) केव्हा होईल हे सांगण्याचा प्रयत्न करणार असून यासाठी विद्यापीठात (Technical University of Denmark) मृत्यूचे कॅलक्युलेटर तयार केले जात आहे. यावर Technical University of Denmark मध्ये काम सुरु आहे. मृत्यूची माहिती घेण्यासाठी ChatGPT चा (ChatGPT) वापर केला जाईल. तसेच यासाठी life2vec या अल्गोरिदमची मदत घेतली जाईल. (Artificial Intelligence)
प्रत्येक धर्मात मृत्यूविषयीच्या अनेक दंतकथा सांगितल्या आहेत. त्याची काही ठोकताळे आणि काही लक्षणं देखील आहेत. परंतु मृत्यू कधी होईल हे कोणीच अचूक सांगत नाही. या तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांच्या मृत्यूची तारीख समजेल. हे एआय मॉडेल तुमची कमाई, व्यवसाय, नोकरी, तुम्ही कुठे राहता आणि तुमचे एकूणच आरोग्य याचा वापर करुन मृत्यूबद्दल सांगेल. आतापर्यंतच्या निकालात 78 टक्के निकाल तंतोतत जुळल्याचा दावा केला जात आहे.
Supriya Sule । सुप्रिया सुळेंनी घेतला अजितदादांचा धसका, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय