विमानाने प्रवास (Travel by flight) करताना विशेष दक्षता पाळावी लागते. मात्र तरीदेखील विमान प्रवासात अनेक विचित्र घटना घडतात. मध्यंतरी विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिलेला विंचू चावल्याची घटना घडली होती. याशिवाय विमानामध्ये चोरीच्या किंवा भांडणाच्या घटना घडतच असतात. दरम्यान विमानामधील गैरकृत्याची एक नवीन घटना समोर आली आहे. ( wrong behaviour in flight)
आकाश एअरलाईन्स ( Aakash Airlines) मधून विमान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने प्रवासादरम्यान एक गैरकृत्य केले आहे. प्रवीण कुमार असे त्याचे नाव आहे. प्रवीण अहमदाबादवरून बंगळुरूला विमानामधून जात होता. यावेळी त्याने विमानामधील सर्व नियम फाट्यावर मारून बिडी ओढली.
Tuljapur | मोठी बातमी! तुळजाभवानी मंदिरात शॉर्ट कपडे घातल्यास भविकांना नो एन्ट्री
विमान हवेत असताना प्रवीणने बिडी पेटवली व धूम्रपान केले. यामुळे विमानात प्रवास करणाऱ्या इतर लोकांचा जीव धोक्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रवीणला अटक करण्यात आली आहे. आपल्या कृत्याबद्दल स्पष्टीकरण देताना प्रवीणने एक धक्कादायक कारण सांगितले आहे.
Breaking । शंभूराज देसाईंची मोठी घोषणा; जलयुक्त शिवार योजना आजपासून सुरू
” मी नेहमी ट्रेनने प्रवास करतो. यावेळी प्रवासादरम्यान धूम्रपान करायचे असल्यास मी टॉयलेट मध्ये जाऊन धूम्रपान करतो. विमानात प्रवास करण्याची माझी पहिलीच वेळ आहे. याठिकाणी धूम्रपान केलेले चालत नाही. हे मला माहीत न्हवते.” असे प्रवीणने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले. प्रवीणला सध्या बंगळुरू येथील सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.