Site icon e लोकहित | Marathi News

Airtel Diwali Offer l एअरटेलने ग्राहकांना दिले दिवाळी गिफ्ट! 26 रुपयांचा नवीन स्वस्त प्लान

Airtel

Airtel Diwali Offer l भारतीय टेलिकॉम क्षेत्रात एअरटेलने ग्राहकांसाठी एक खास दिवाळी गिफ्ट सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी 26 रुपयांचा एक नवीन प्लान लाँच केला आहे. जुलै महिन्यापासून अनेक टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज (Recharge by Telecom Companies) प्लानच्या किमती वाढवल्या, त्यामुळे एअरटेलने यावर्षी अनेक जुने प्लान काढून टाकले आहेत आणि नवीन प्लान्स सादर केले आहेत.

Devendr Fadanvis । लाडकी बहीण रागवली, फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड; विरोधकांची टीका

या 26 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना 1.5GB डेटा मिळतो, जो एका दिवसासाठी वैध आहे. डेटा वापरणाऱ्या अनेक ग्राहकांना दैनंदिन डेटा मर्यादेनंतर अतिरिक्त डेटाची आवश्यकता असते, त्यामुळे एअरटेलने या प्लानद्वारे त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी, एअरटेलने 22 रुपयांच्या प्लानमध्ये 1GB डेटा उपलब्ध केला होता, परंतु आता नवीन प्लानमध्ये ग्राहकांना अधिक डेटा मिळणार आहे.

Ajit Pawar | ‘ही निवडणूक स्त्रीशक्तीची निवडणूक असेल, महाराष्ट्राचे भवितव्य महिलाच ठरवतील’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

एअरटेलच्या बिग डेटा ॲडऑन प्लॅन्सबद्दल बोलायचे झाले तर, 77 रुपयांच्या प्लानमध्ये 5GB डेटा आणि 121 रुपयांच्या प्लानमध्ये 6GB डेटा उपलब्ध आहे. रिलायन्स जिओही ग्राहकांसाठी अशाच प्रकारचे डेटा प्लान ऑफर करत आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज प्लानच्या किमती वाढल्यानंतर, BSNL ने 4G आणि 5G सेवांसह आपला विस्तार करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे BSNL साठी मोठी संधी निर्माण झाली आहे, जी टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा वाढवेल.

Ajit Pawar । अजित पवारांची जनसन्मान यात्रा चंदगड, कोल्हापुरात दाखल

Spread the love
Exit mobile version