
सिगारेट ची तलफ व्यसनी लोकांना शांत बसू देत नाही. ‘धूम्रपान करना मना है’ च्या सूचना ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी या लोकांची चांगलीच पंचाईत होते. दरम्यान सिगरेट मुळे एक तरुणी चांगलीच अडचणीत सापडली आहे. मुंबईमधून रांचीला जाणाऱ्या विमानाच्या टॉयलेटमध्ये सिगरेट पिण्याच्या पराक्रम या तरुणीने केला आहे.
मोठी बातमी! अदिलने कोर्टातच दिली राखीला धमकी; म्हणाला, “मी बाहेर आल्यावर…”
या विमानाच्या कर्मचाऱ्यांना टॉयलेटमधून धूर येताना दिसला. यावेळी त्यांनी तपासणी केली असता, ही धक्कादायक घटना समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यावर जाब विचारला असता, या तरुणीने चक्क शाहरुख खानचे ( Shahrukh Khan) नाव पुढे केले आहे. या तरुणीविरोधात एव्हिऐशन सिक्युरिटी कायद्यातंर्गत तक्रात दाखल करण्यात आली आहे.
विमानात सिगरेट पिणाऱ्या या तरुणीचे नाव ऐश्वर्या राय (Aishwarya rai) असे आहे. ही तरुणी रांचीत राहणारी आहे. ती मुंबईत अभिनेता शाहरुख खानला भेटायला आली होती. शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटावर लिहिलेला ब्लॉग दाखवण्यासाठी तिला त्याची भेट घ्यायची होती. यावेळी मुंबईवरून पुन्हा रांचीला परतताना ही घटना घडली आहे. शाहरुख खानची भेट झाली की नाही ?याबाबत मात्र ऐश्वर्या ने काही माहिती दिलेली नाही.
हार्दिक आणि नताशा यांच्या लग्नाच्या हळदीचे आणि मेहंदीचे फोटो होताहेत व्हायरल; पाहा PHOTO
दरम्यान ही तरुणी विमानात सिगरेट व माचीस घेऊन गेलीच कशी? असा प्रश्न उभा राहतोय. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्याचा धक्का बसेल पण चक्क एअरपोर्ट सुरक्षेला चकमा देत ही तरुणी विमानात सिगरेट व माचीस घेऊन गेली होती. ऐश्वर्याला सध्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
किंग खानचा मुलगा आर्यन खानचा व्हिडिओ व्हायरल; व्हिडिओ पाहून चाहते संतापले म्हणाले…