मुंबई : गायन क्षेत्रातील अजय-अतुल (Ajay-Atul) ही जोडी लोकप्रिय जोडी आहे. ही जोडी सोशल मीडियावर त्यांच्या गायनामुळे कायम चर्चेत असते. त्यांची गाणी प्रेक्षकांना वेड करून सोडतात. फक्त मराठीमध्येच नाहीतर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी गाण्यांमुळे प्रेक्षकांना भुरळ घातलीये. आता अजय-अतुल त्यांच्या कृतीमुळे एका चर्चेत आले आहेत.
मोठी बातमी! राज्यातील शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता
मागच्या काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलाचा ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ हे गाणं गातानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता .तो मुलगा अहमदनगर जिल्ह्यातील राहणार असून जयेश खरे (Jayesh Khare) असे त्याचे नाव आहे. त्याच्या मधूर आवाजातील गाणं गातानाचा त्याचा व्हिडीओ अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचला. त्या शाळकरी मुलाच्या आवाजाने अजय-अतुल यांना देखील भुरळ पाडली आहे. जयेशला अजय-अतुल यांनी चित्रपटात गाण्याची संधी दिल्याची माहिती समोर आली आहे.
अजय-अतुलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन जयेशबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केलाय. आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “रसिकहो, तुमच्यामुळे आम्हाला अस्सल मातीतला कलाकार सापडला…!!! ही आहे आजच्या महाराष्ट्राची ताकद, सर्वांचे मनापासून आभार”.