
Ajay Baraskar । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. अजय महाराज बारसकर यांनी पुन्हा पत्रकार परिषद देत जरांगे यांच्यावर आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईत आला तेव्हा कुणाचे कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहीलं? असा मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर आपल्याकडे व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप असल्याचा दावा अजय बारस्कर यांनी केला आहे.
Pune News । पिट्या भाईंनी समोर आणला पुण्यातील धक्कादायक व्हिडीओ; तरुण मुली नशेत…
त्याचबरोबर अजय महाराज बारसकर म्हणाले, जरांगे यांच्या पाहुण्यांकडे वाळू काढायच्या एवढ्या डंपर गाड्या कशा आल्या, रातोरात एवढा पैसा कुठून आला? वाळूचा धंदा चालतो, असा गंभीर आरोप अजय बारसकर यांनी केला. असे अनेक गंभीर आरोप अजय बारसर यांनी केले आहेत.
त्याचबरोबर “मी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि इतर चाचण्यांना सामोरे जायला तयार आहे. तुम्ही जर खरे असताल तर तुम्ही देखील चाचण्यांना सामोरे जा. आज म्हणजेच रविवारी 11 वाजता इथे बॉम्ब फुटणार आहे. 11 वाजता या. मी खुलासा करेन. पत्रकार परिषद घेणारी लोक वेगळी असतील”, असा इशारा अजय महाराज बारस्कर यांनी दिला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
Eknath Shinde । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! गटातील आमदारावर गुन्हा दाखल