Ajay Baraskar । मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे सहकारी अजय बारसकर यांनी जरांगे यांच्यावर मागच्या काही दिवसापूर्वी गंभीर आरोप केले आहेत. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केल्यामुळे अजय बारसकर यांचा मराठा समाजाकडून निषेध व्यक्त होत आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच सोशल मीडियावर अजय बारसकर यांचा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सोबतचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सध्या हा फोटो चर्चेत असून अजय बारसकर यांनी फडणवीसांसोबतच्या फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, माझा फडणवीसांसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याबद्दल मी आभार मानतो.. कारण बऱ्याच दिवसापासून मी देखील हा फोटो शोधत होतो.. या फोटोतील मंडळी पुण्यातील आहे. त्यांनाच विचारा आम्ही फडणवीसांची भेट का घेतली?
Budget Session । फसवणूक नको, आरक्षण द्या; विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी
त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “निवडणुकीची तिकीट मागायला गेलो होतो का? मी त्यांचा कार्यकर्ता आहे की, पदाधिकारी? का लाचार कुत्रा आहे? या लोकांना विचारा. 2017 साली मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी फडणवीस यांची भेट घेतली होती आणि भेटी या घ्यावयाच लागतात. आरक्षण मारुतीच्या मंदिरात बसून मिळत नाही. सरकार दरबारात, न्यायालयामध्ये जावं लागतं. असं अजय बारसकर म्हणाले आहेत.