Ajay Maharaj Barskar । मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा अत्यंत जवळचा मित्र अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. मात्र अजय महाराज बारस्कर यांना टीका करणे चांगलेच भोवले आहे. अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांना प्रहार जनशक्ती पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी ही कारवाई केली आहे.
Pandharisheth Phadake | गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके यांच्या मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर!
पक्षाचा जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे. मात्र बारस्कर यांनी पक्षाविरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. त्याचबरोबर अजय महाराज बारस्कर यांनी केलेल्या कोणत्याही विधानाशी पक्ष सहमत नाही. पक्षाची ती अधिकृत भूमिका नसल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लू उर्फ महेंद्र जवंजाळ यांनी एक निवेदन काढून ही माहिती दिली आहे.
अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत केलेल्या कोणत्याही वक्तव्याचे प्रहार संघटना समर्थन करत नाही किंवा आमचा या विधानाशी काही संबंध नाही. अजय महाराज बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पार्टी आणि प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा आज पासून पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Sharad Pawar । ‘या’ बड्या नेत्याला आज उद्या अटक होणार; शरद पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य