Ajinkya Rahane IPL(2023) एमएस धोनीने (MS Dhoni) अजिंक्य रहाणेचे नशीब बदलले आहे. आता टीम इंडियाचे दरवाजे रहाणेसाठी पुन्हा उघडले आहेत. IPL च्या चालू मोसमात अजिंक्य रहाणे चमकदार कामगिरी करत आहे. IPL च्या शानदार फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेला टीम इंडियात पुनरागमनाचे दरवाजे खुले झाले आहेत. रहाणेच्या IPL मधील उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय एमएस धोनीला जाते, ज्याने या अनुभवी फलंदाजावर विश्वास ठेवला. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने अप्रतिम खेळ दाखवला आहे.
MS Dhoni’s Captaincy CSK ने आतापर्यंत ७ पैकी ५ सामने जिंकले असून गुणतालिकेत CSK अव्वल स्थानावर आहे. CSK च्या या शानदार कामगिरीमध्ये ३४ वर्षीय अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रहाणेने आतापर्यंत पाच सामन्यांत १९९.०४ च्या स्ट्राइक रेटने २०९ धावा केल्या आहेत. या मोसमातील कोणत्याही स्पेशालिस्ट फलंदाजाचा हा सध्याचा सर्वोच्च स्ट्राइक रेट आहे. हाणेची फलंदाजी पाहून चाहते आणि क्रिकेट तज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत.
KKR विरुद्धच्या सामन्यात रहाणेने ज्या प्रकारची फलंदाजी केली ती खरोखरच थक्क करणारी होती. रहाणेने त्या सामन्यात २९ चेंडूत ७१ धावांच्या खेळीदरम्यान असे फटके मारले ज्यामुळे AB Devilliers ची आठवण झाली. रहाणेने Mumbai Indians विरुद्धच्या सामन्यात २७ चेंडूत ६१ धावा केल्या. IPL२०२३मधील अजिंक्य रहाणेच्या या शानदार यशाचे श्रेय CSK कर्णधार एमएस धोनीला दिले जात आहे, ज्याने या अनुभवी फलंदाजावर विश्वास व्यक्त केला. आणि त्याला मुक्तपणे खेळण्याची प्रेरणा दिली. रहाणेला तंत्र आणि फलंदाजीच्या शैलीत बदल करण्याचाही फायदा झालेला आहे.
Sanjay Raut: मोठी बातमी! संजय राऊत उद्या भीमा पाटस कारखान्यासमोर घेणार सभा
रहाणेदेखील या चमत्कारी फलंदाजीचे श्रेय एमएस धोनीला देत आहे. तो म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही माही भाईच्या (Dhoni) नेतृत्वाखाली खेळता तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळते. एक फलंदाज आणि क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला नेहमीच पुढे जायचे असते.
Yogi Adityanath : ब्रेकिंग! योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी