मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीमध्ये नाराज असून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ माजली आहे. खुद्द अजितदादांनी देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, तरीही चर्चा काही थांबता थांबत नाहीत. नुकतीच अजित पवार यांनी एका वृत्तसमूहाला मुलाखत दिली आहे.
सलमान खान याच्याबद्दल ‘ही’ गोष्ट ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
यावेळी अजित पवार यांनी राजकारणावर तसेच लोकसंख्यावाढीवर देखील भाष्य केलं आहे. सध्या भारताने लोकसंख्येच्या बाबतीती चीनला देखील मागे टाकले आहे. आता याबाबत बोलताना अजित पवार यांनी मिश्किल भाषेत प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांना मोठा धक्का; जवळच्या विश्वासू नेत्याची भाजपसोबत हात मिळवणी
अजित पवार म्हणाले, “अपत्य परमेश्वर किंवा अल्लाची कृपा नसते. तर ही नवरा-बायकोची कृपा असते. हे सर्वांनी मान्य करायला हवं. अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाकली पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “मुलीला देखील तेवढाच अधिकार आणि मानसन्मान दिला पाहिजे. दोन्ही मुली असतील तर काही बिघडत नाही.” सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा चालू आहे.