Ajit Gopchade । भाजपकडून राज्यसभेचे तिकीट मिळवणारे अजित गोपछडे नेमके कोण आहेत?

Ajit Gopchade

Ajit Gopchade । सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज अखेर भाजपकडून राज्यसभेच्या 6 पैकी 3 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण आणि विदर्भातील भाजपचे नेते अजित गोपछडे (Ajit Gopchade) यांचा समावेश आहे. अजित गोपछडे यांचं नाव समोर आल्यानंतर ते नेमके कोण आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Rajya Sabha Election | भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर; ‘या’ नेत्यांना मिळाली संधी

कोण आहेत अजित गोपछडे? (Who is Ajit Gopchade?)

अजित गोपछडे हे भारतीय राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व डॉ. ते भाजपशी संबंधित असून त्यांनी पक्षात महत्त्वाची पदे भूषवली आहेत. डॉ. अजित गोपचडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या हिंदू राष्ट्रवादी संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या भाजपशी संबंधित विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहेत.

Prakash Ambedkar । प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना केले मोठे आव्हान; म्हणाले, “शरीराला त्रास देऊन…”

आगामी राज्यसभा निवडणुकीत त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. गोपछडे हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कोल्हे बोरगाव गावचे रहिवासी आहेत. गोपछडे यांचे बारावीचे शिक्षण नांदेडला यशवंत महाविद्यालयात झाले असून त्यांनी एमबीबीएस औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पदव्युत्तर शिक्षण (बालरोगतज्ज्ञ) अंबेजोगाई (जि. बिड) येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात झाले.

Mobiles under 10000 । 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणार हे स्मार्टफोन, रॅम-बॅटरीही मजबूत; जाणून घ्या

Spread the love