Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी करत अजित पवार यांनी मागच्या काही महिन्यापूर्वी शिंदे फडणवीस सरकार सोबत हात मिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलं ढवळून निघालं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. यानंतर हे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले. (Ajit Pawar)
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जे आमदार अजित पवार गटात गेले त्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी आता शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात २ सप्टेंबर रोजी शरद पवार गटाच्या शिस्त पालन समितीची बैठक देखील पार पडली. यावेळी या बैठकीमध्ये 24 आमदारांची नावे ही कारवाईसाठी निश्चित करण्यात आली आहेत.
या आमदारांच्या नावाची यादी देखील तयार करण्यात आली आहे. त्यामुळे हे 24 आमदार अजित पवार गटातील असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. आता या संबंधित 24 आमदारांना ही यादी आणि पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेचा आमदारांचा देखील समावेश असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता अजित पवार गटामधील या सर्व 24 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे.