पुण्यामध्ये चिंचवड व कसबा विधानसभा पोटनिवडणूक (Chinchwad – Kasba Assembly Elections) अगदी तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना ‘एकजूट होऊन काम करा’ असा सल्ला दिला आहे. तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचे आवाहन देखील केले आहे.
मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी मांडला अनोखा थाट; वऱ्हाडी आणले चक्क बैलगाडीमधून!
यावेळी ते म्हणाले की, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी खूप कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे १८ तासांहून अधिक वेळ काम करावे लागणार आहे. इतर ठिकाणी जास्त वेळ न घालवता एकजुटीने काम करा व मतदारांना केंद्रबिंदू माना. आताची एकजूटच अगामी विधानसभा आणि महानगरपालिकेच्या परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.
महाराष्ट्रात जूनमध्ये गलिच्छ आणि गद्दारीचे राजकारण झाले आहे. त्या राजकारणाला मतांच्या रुपाने उत्तर देण्याची संधी चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे. या संधीचे सोने करूयात. चिंचवडमधील कोणत्या भागात कोण आले तर फायदा होईल? याची यादी द्यावी. त्यानुसार प्रचारकांचे नियोजन करण्यात येईल. तुम्हाला जे काही हवे ते सांगा, मला फक्त यश हवे आहे. बाकी तुमचे कष्ट वाया जाणार नाहीत, याची जबाबदारी माझी. असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पेरला आहे.
महाविकास आघाडी सरकार पडण्यास नाना पटोलेच जबाबदार! शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट