Ajit Pawar । राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापुर्वीच शिरूर मतदार संघ चर्चेच्या केंद्रस्थानी होता. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिल्याने या मतदारसंघाचे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. असे असतानाच आता अजित पवार यांनी अमोल कोल्हे विरोधात एक नवीन डाव टाकला आहे.
Pune News । बिग ब्रेकिंग! निवडणुकांच्या तोंडावर पुणे पोलिसांनी आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय
शिरूर मतदार संघात अजित पवार यांच्याकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. याबाबत आज सकाळी दिलीप मोहिते यांच्या बंगल्यातील बैठकीत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या मतदार संघासाठी नाना पाटेकर यांना देखील विचारणा केली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. शिवाजी आढळराव पाटील हे आमदारांच्या कामात अडथळा आणणार नसल्याने त्यांना शिरूरमधून उमेदवारी दिली जात आहे, असं अजित पवार यांनी सांगितले आहे.
दरम्यान, 2019 च्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांचा विजय झाला. कोल्हे यांना निवडून आणण्यामागे अजित पवारांचा हात होता. त्यासाठी अजित पवारांनी जीवाचं रान देखील केले होते. विशेष म्हणजे ज्या आमदाराला अजित पवारांनी निवडून आणलं त्याच आमदारांना आता पाडण्याचा निश्चय अजितदादांनी बांधला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Rohit Pawar । अमोल मिटकरी यांनी काढली रोहित पवारांची लायकी, म्हणाले; “तुझी खरी लायकी केवळ…”