Ajit Pawar । दोन दिवसांपासुन नॉट रिचेबल असलेले अजित दादा आता ऍक्शन मोडवर!

Ajit Pawar

Ajit Pawar । राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती दोन दिवसांपासून चर्चेचा विषय बनली होती. यामुळे अनेक कार्यकर्त्यांना चिंता वाटत होती, पण अखेर अजित पवार यांचा गायब होण्यामागचं कारण स्पष्ट झाले आहे. त्यांना घशाचे इन्फेक्शन झाल्यामुळे ते दोन दिवस आराम करत होते, अशी माहिती आता समोर आली आहे.

Eknath Shinde । ब्रेकिंग! शिंदे गटातील बडा नेता करणार बंडखोरी? धनुष्यबाण हटवला

अजित पवार यांची अनुपस्थिती विधानसभेच्या कामकाजापासून सुरू झाली होती, परंतु आता त्यांची तब्येत सुधारली आहे आणि ते आजपासून विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार आहेत. यासाठी त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शासकीय निवासस्थानी ते कार्यकर्त्यांची भेट घेत होते.

Sushma Andhare । सर्वात मोठी बातमी! सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; नागपूर विमानतळावर धक्कादायक घटना

त्यानंतर आमदार सुनील तटकरे यांनी या प्रकरणावर भाष्य करत अजित पवार यांच्या अनुपस्थितीला तब्येतीच्या कारणामुळे असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी अजित पवार हे दिल्लीला न गेल्याचे आणि ते केवळ नागपुरात आराम करत असल्याचे सांगितले. तसेच, पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल कोणतीही निराधार चर्चा करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर आज अजित पवार पुन्हा अॅक्टिव्ह झाले असून, शशिकांत शिंदे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे आणि इतर नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे.

Eknath Shinde । मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्यांना एकनाथ शिंदें यांनी दिला मोठा सल्ला; म्हणाले…

Spread the love