Ajit Pawar । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जनसन्मान यात्रेची घोषणा केली आहे. आज ही यात्रा नाशिक या ठिकाणी होत असून येवल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 ऑगस्टला खात्यात जमा होणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर ही योजना सुरू ठेवायची असेल तर आम्हाला निवडून द्या असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले.
Team India Hockey । भारतीय हॉकी संघाने स्पेनचा पराभव करत जिंकले कांस्यपदक!
अजित पवार म्हणाले, “लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्या खात्यांची माहिती आमच्याकडे आली आहे. त्यावर सध्या काम सुरू आहे. येत्या 17 तारखेला तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे.”
त्याचबरोबर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले “मी चांगले काम घेऊन तुमच्या पुढे आलोय. कांदा निर्यात बंदी करायची नाही यावर देखील आमचे एकमत झालेले आहे. लोकसभेला दिलेला झटका जोरदार लागला आहे. चूक झाली माफ करा जो काम करतो तो चुकतो. अबकी बार 400 पार मुळे देखील झटका लागला कोणत्याही परिस्थितीत कांदा निर्यातबंदी करायची नाही असे अजित पवार यांनी सांगितले. कांदा निर्यात बंदी निर्णयाचा फटका लोकसभेला बसल्याची कबुली देखील यावेळी अजित पवार यांनी दिली.