Ajit Pawar । महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर, भाजपसोबत गेलेल्या अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याशी संबंधित एक मोठा खुलासा समोर आला आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024: द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात एक धक्कादायक खुलासा केला आहे. भुजबळ यांनी सांगितले की, ईडीच्या (एनफोर्समेंट डायरेक्टोरेट) दबावामुळेच त्यांना भाजपसोबत जाऊन सत्तेसाठी हातमिळवणी करणे भाग पडले.
Congress । सर्वात मोठी बातमी! काँग्रेस ऍक्शन मोडवर, बंडखोर नेत्यांविरोधात केली मोठी कारवाई
भुजबळ यांनी स्पष्टपणे म्हटले की, “ईडी माझ्या मागे लागली होती कारण मी ओबीसी आहे. मी जर उच्च जातीतला असतो, तर हे सर्व झाले नसते. दोन अडीच वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर आणि जामिनावर बाहेर आल्यानंतर मला पुन्हा ईडीची नोटीस आली.” ते म्हणाले की, भाजपसोबत जाण्याशिवाय त्यांना सुटका मिळवणे शक्य नव्हते.
Congress । सर्वात मोठी बातमी! काँग्रेस ऍक्शन मोडवर, बंडखोर नेत्यांविरोधात केली मोठी कारवाई
शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनाही ईडीच्या चौकशीचा सामना करावा लागला होता. भुजबळ यांनी अजित पवारांच्या ईडी चौकशीतून सुटण्याच्या कारणाची माहिती दिली, तसेच साखर कारखान्याच्या विक्रीवरून त्यांना घेरले गेले होते. अजित पवार यांचीही ईडीने चौकशी सुरू केली होती. कारखान्यात सर्वाधिक भागभांडवल हे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नावे होते. कदाचित पत्नीला अटक होऊ शकते, असे अजित पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळेच अजित पवारांनाही घाम फुटला होता.”, असं भुजबळ यांनी म्हटलं असल्याचं या पुस्तकात नमूद करण्यात भुजबळ यांच्या या खुलासामुळे राज्यात खळबळ उडाली आहे आणि हा मुद्दा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.