Ajit Pawar । मागील काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गँग (Koyta Gang) राडा करताना पहायला मिळत आहे. यासाठी पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या शक्कल लढवून देखील कोयता गँगला अजून आळा बसलेला नाही. यामुळे आता पुण्याचा बिहार (Bihar) होतोय का? असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये येत आहे. दरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयता गँगला थेट धमकी दिली आहे.
पुण्यामधील कोयता गँगचा सुपडा साफ करणार असल्याचा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. आता पदर नाही, धोतर नाही डायरेक्ट टायरमध्ये टाकूनच करवाई करणार असा दमच अजित पवार यांनी भरला आहे. पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी जाहीरपणे कोयता गॅंगला दम दिला आहे.
Crime News । धक्कादायक! अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
कोयता गॅंगची दहशत पाहून या गँगविरोधात थेट खासदार अमोल कोल्हे देखील रस्त्यावर उतरले होते. अमोल कोल्हे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित कोयता गँगवर कारवाई करण्याची मागणी केली. गुंडगिरी संपवून अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करा, गुन्हेगारांना पाठीशी घालणा-या पोलीस अधिका-यांवरही कारवाई करा अशी मागणी अमोल कोल्हेंनी पत्रातून केली होती.
Nashik News । ब्रेकिंग! गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला, अनैतिक संबंधातून माजी सैनिकाची हत्या