विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे कायम त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध असतात. एखाद्याची कधी ते उचलबांगडी करतील हे सांगू शकत नाही. व्यवस्थित काम न करणारे सरकारी अधिकारी असोत किंवा मोठे राजकीय नेते कामचुकारपणा समोर अजित पवार कोणाचीच गय करत नाहीत. भर कार्यक्रमात देखील एखाद्याला बोलायला अजित पवार मागेपुढे बघत नाहीत. सध्या अजित पवारांचा एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (viral video)
IPL Final | आयपीएलच्या फायनल मॅचला पावसाची हजेरी! आता ‘या’ तारखेला होणार सामना
यामध्ये अजित पवार एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी (inauguration of hotel) गेले आहेत. फित कापून हॉटेलचे उद्घाटन करून झाल्यानंतर अजित पवार त्या संपूर्ण हॉटेलची पाहणी करतात. तिथल्या सोयी-सुविधा व बांधकामाबद्दल माहिती घेतात. यावेळी एक छोटीशी चूक त्यांच्या लक्षात येते. यावरून ते थेट हॉटेल मालकाला चूक दाखवून देतात.
बिग ब्रेकिंग! चेन्नई सुपर किंग्सच्या ‘या’ बड्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, ट्विट करत म्हणाला…
हॉटेलच्या बाथरूम शॉवरमध्ये अजित पवारांना कमी हेडस्पेस जाणवतो. यावेळी ते खुद्द हॉटेल मालकाला शॉवर खाली उभे करून चूक दाखवून देतात. या घटनेमुळे हॉटेल मालक चांगलाच ओशाळून जातो. मात्र त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जोराचा हशा पिकतो.
Delhi Police | दिल्ली पोलिसांचे महिला कुस्तीपट्टूंसोबत चुकीचे वर्तन! महिला आयोगाने व्यक्त केला संताप