Ajit Pawar । तुम्हाला काय लागेल तो निधी आम्ही द्यायला सहकार्य करू. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी देतोय तशी आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकचा बटणं दाबा. म्हणजे आम्हाला निधी द्यायला बरं वाटेल. नाही तर माझा हात आखडता येईल, असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता सगळीकडे चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
Sharad Pawar । राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर; शरद पवारांनी खेळली मोठी खेळी
उपमुख्यंमत्री अजित पवार हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. आज त्यांनी इंदापूरच्या राधिका पॅलेसमध्ये अजित पवारांनी वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. या सभेमध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केले असून सध्या त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest marathi news) आता यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
Ajit Pawar । मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवारांची जीभ घसरली; केले वादग्रस्त वक्तव्य
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “परवा राहुल गांधी काय म्हणाले?. आता कुठल्या गोष्टीत ‘ध चा मा’ करु नये. मी तिथे गंमतीने म्हटलं. स ती जाहीर सभा नव्हती, मर्यादीत लोकांची सभा होती. विकासाल निधी देण्याच आमदार, खासदाराच काम असतं. आमचा सांगण्याचा प्रयत्न हाच असतो की, मागे ज्याने काम केलं, त्यापेक्षा जास्त विकास आम्ही करु. हे साध सरळ गणित आहे. मी आपल्या ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं, उगाच कोणी त्यावरुन बाऊ करु नये” असं अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
Accident News । भीषण अपघात, कार-ट्रेलरच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू