Ajit Pawar । मुंबईच्या उल्हासनगर परिसरात मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हिललाईन पुणे पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “कोणाला कोणतीही तक्रार असेल तर ती पोलीस स्टेशनमध्ये केली पाहिजे. पण हे सगळं पोलीस स्टेशनच्या आवारात घडल्याची मला माहिती मिळाली आहे” असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमत्री आहेत, मी त्यांचाशी बोलणार आहे. एवढी टोकाची मजल का मारली?. टीव्ही चॅनलशी फोनवरुन काही संभाषण जे केलं, ते कायद्याला धरुन अजिबात नाही. हे माझं स्पष्ट मत आहे” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
दरम्यान, कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यात नेहमीच वाद होत होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले होते. त्यानंतर हे प्रकरण हिललाईन पोलीस ठाण्यापर्यंत गेले आणि यावेळी संतापलेल्या भाजप आमदाराने महेश गायकवाड यांच्यावर एकापाठोपाठ जवळपास पाच गोळ्या झाडल्या.
गणपत गायकवाड यांची आमदारकी जाण्याची शक्यता
पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हिललाईन पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या अटकेनंतर आता त्यांची आमदारकी देखील जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mahesh Gaikwad News । महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट