Ajit Pawar । अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांच्या समर्थकांनाही वाटते की दादांनी मुख्यमंत्री व्हावे. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान आता त्यांनी कर्जत मधल्या सभेत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आधी लोकसभेची निवडणूक (Lok Sabha election) आहे आणि त्यानंतर तुमच्या मनात काय आहे ते होईल. असं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रीपदाचे संकेत दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Adani Group Business । अदानींच्या कंपनीचा मोठा धमाका, दोन दिवसांत केली 21,545 कोटींची कमाई
रायगड (Raigad) मधील कर्जतमध्ये बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार सभा पाडली पार पडली. या सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना ते मुख्यमंत्री व्हावेत असं सतत वाटते आता यावर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे.
Car Accident News । भीषण अपघात! कारच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
कर्जत या ठिकाणी सभेमध्ये भाषण करताना काही कार्यकर्ते तरुण खालून घोषणा देत होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आधी लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल असे अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे आणि अजित पवार यांनी एक प्रकारे मुख्यमंत्रीपदाबाबत संकेत दिले असे म्हटले जात आहे.