Ajit Pawar । ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या एक धक्कादायक दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरदेसाई यांच्या पुस्तकानुसार, छगन भुजबळ यांनी ईडीच्या कारवाईपासून सुटका मिळवण्यासाठी भाजपसोबत हात मिळवली, आणि त्यांना ईडीपासून सुटका म्हणजे पुनर्जन्म असल्याचं भुजबळांनी सांगितल्याचा दावा केला आहे. या पुस्तकात भुजबळांच्या एका मुलाखतीचा उल्लेख आहे, ज्यामध्ये त्यांनी आपली सत्तेत असलेल्या अजित पवारांसोबत आणि भाजपसोबतच सुटकेची वाट पाहिली असल्याचं स्पष्ट केले आहे.
या दाव्यांवर भुजबळांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी सरदेसाई यांच्या पुस्तकातील आरोप फेटाळले आहेत. भुजबळ यांनी स्पष्ट केले की, त्यांनी अशा कोणत्याही मुलाखतीत सहभागी होऊन या प्रकारचे वक्तव्य केले नाही. तसेच, सरदेसाई यांच्या पुस्तकावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. भुजबळांच्या आरोपानुसार, ईडीच्या तपासात त्यांना फसवले जात असल्याचं आणि त्यांना वळणावर न्याय मिळावा अशी त्यांची इच्छा होती. त्याचवेळी, त्यांनी भाजपसोबत हात मिळवून आपली कारवाई थांबवण्याची पद्धत स्वीकारली असल्याचे सुचवले.
Devendr Fadanvis । ब्रेकिंग! शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा, ‘या’ गोष्टी देणार शेतकऱ्यांना
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळांना अडीच वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. त्या काळात त्यांची तब्येतही गंभीर होती. तशाच परिस्थितीत पुन्हा ईडीची नोटीस आल्यानंतर, भुजबळांनी ईडीपासून सुटकेची भावना व्यक्त केली होती. या पुस्तकामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.