Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवार गटाची वाढणार ताकत; बडा नेता करणार पक्षात प्रवेश

Ajit Pawar

Ajit Pawar । लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) धामधूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक मोठ्या घडामोडी राज्याच्या राजकारणात घडत आहेत. दरम्यान आता सध्या देखील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी लवकरच अजित पवार गटात (Ajit Pawar group) प्रवेश करणार असल्याची माहिती साम वृत्तवाहिनीला सूत्रांनी दिली आहे.

Baramati Loksabha । बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ! अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह; सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगात धाव

राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेशाबाबत अबू आझमी (Abu Azmi) यांची प्रफुल पटेल यांच्यासोबत भेट झाल्याची देखील माहिती मिळत आहे. येत्या चार दिवसात अबू आझमी अजित पवार गटात प्रवेश करू शकतात अशी देखील माहिती साम वृत्तवाहिनीला सूत्रांकडून मिळाली आहे. मागच्या काही दिवसापासून अबू आझमी हे समाजवादी पक्षात नाराज असल्याने ते अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहेत.

Ajit Pawar । अजित पवारांबाबत बड्या नेत्याचं धक्कादायक विधान; म्हणाले…

या अनुषंगाने त्यांची प्रफुल पटेल यांच्यासोबत भेट झाली असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. अबू आझमी यांच्या पाठीशी मुस्लिम मतदार संघ जास्त आहे. त्यामुळे जर त्यांनी अजित पवार यांची साथ दिली तर अजित पवार यांची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! भाजपच्या नव्या प्रस्तावाने एकनाथ शिंदेंना बसणार फटका

Spread the love
Exit mobile version