Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे उपचार करणारे डॉक्टर संजय कोकाटे यांनी अजित पवार यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. अजित पवार यांना 101 ताप असून त्यांना मोठ्या प्रमाणात विकनेस जाणवत आहे त्यांच्यावर घरी उपचार चालू असून त्यांना घरीच सलाईन लावली जात आहे.
Ajit Pawar । धक्कादायक! अजितदादा गटाच्या आमदाराचा मराठा बांधवानी पेटवला बंगला
त्याचबरोबर त्यांच्या शरीरामधील पांढऱ्या पेशी देखील कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आज अजित पवार यांची प्लेटलेट्स बाबतची चाचणी देखील केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे देखील डॉक्टरांनी म्हटले आहे. (Platelets test by Ajit Pawar)
डॉक्टर संजय कोकाटे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या प्रकृती बाबत सविस्तर माहिती दिली आहे. मागच्या पाच दिवसापासून अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसापासून अजित दादांना डेंग्यूची लागण झाली होती. एनएसवन टायटन स्ट्राँगली पॉझिटिव्ह आहे. आतादेखील त्यांना 101 इतका ताप आहे”, असं डॉक्टरांनी सांगितलं.
Maratha Reservation । मराठा आरक्षणाबाबत इंदुरीकर महाराजांनी घेतला आजवरचा सर्वात मोठा निर्णय!