Ajit Pawar । सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकारणी नेते एकमेकांवर कडवट टीका करताना दिसत आहेत. सध्या एका प्रचारसभेत तावातावाने भाषण करताना सदाभाऊ खोत यांनी वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.
Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार? स्वतःच दिली मोठी माहिती
सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरुन बोलत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. या टीकेवर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. अजित दादा गट महायुतीमध्ये सामील असला तरी शरद पवार यांच्यावरील वैयक्तिक पातळीवरील ही टीका मात्र अजित पवार यांना आवडलेली नाही.
Harshvardhan Patil । सर्वात मोठी बातमी! हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकीच्या तोंडावर बसला मोठा धक्का
त्यांनी याबाबत एक्सवर लिहिले की, “ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Harshvardhan Patil । सर्वात मोठी बातमी! हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकीच्या तोंडावर बसला मोठा धक्का