Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे कायमच चर्चेत येत असतात. ते कधीही कोणाची मुलाहिजा न ठेवता बेधडकपणे बोलून टाकतात. त्यामुळे त्यांची वक्तव्य देखील प्रचंड चर्चेत असतात. अजित पवारांसोबत बैठकीला जाताना अधिकारी देखील चांगला अभ्यास करून जातात. दरम्यान शुक्रवारी संभाजीनगर दौऱ्यावर अजित पवार असताना सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक घेत होते. यावेळी या बैठकीला मुख्य अभियंताच आले नाही त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले आहेत.
आम्ही या ठिकाणी माशा मारायला आलो आहोत का? बैठकीला यायला CE यांना काय अडचण आहे? अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? एवढा निष्काळजीपणा मी खपवून घेणार नाही. त्यांना लगेचच बोलून घ्या, असे आदेश अजित पवार यांनी दिले. त्यामुळे बैठकीतील तापमान चांगलेच वाढल्याचे पाहायला मिळाले
Devendra Fadnavis । एबीपी लाइव्हशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी केले सर्वात मोठे वक्तव्य!
त्याचबरोबर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र तरी देखील निधी खर्च झालेला नाही याबद्दल देखील अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.