शरद पवारांच्या (Sharad Pawar) राजीनामा देण्याच्या निर्णयावर अजित पवारांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेची ठरली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी याच पार्श्वभूमीवर अजित पवारांवर टीका केली होती. इतकंच नाही तर त्यांनी अजित पवारांची ( Ajit Pawar) मिमिक्री सुद्धा करून दाखवली होती.
संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? शरद पवार म्हणाले, “कोणी तरी गांभीर्याने…”
यावर बोलताना अजित पवारांनी राज ठाकरेंना जोरदार शाब्दिक टोला मारला आहे. राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरं काय जमतं ? मिमिक्री हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण, जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यांच्यासोबत आधीपासून जे लोक होते, त्यापैकी काही लोक सोडले तर आता सगळे त्यांच्यापासून दूर गेले आहेत.
Wtc Final 2023 | टीम इंडियाला मोठा दिलासा; केएल राहुलच्या जागी ‘या’ दिग्गज खेळाडूची निवड
खरंतर, राज ठाकरेंना त्यांचा पक्ष वाढवण्यापेक्षा अजित पवारची मिमिक्री करणे आणि अजित पवारचे व्यंगचित्र काढणे यात समाधान वाटतं आहे. यामधूनच राज ठाकरे समाधानी होत असतील, तर त्यांना शुभेच्छा! असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना फटकारले आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे ?
रत्नागिरी ( Ratnagiri) येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी अजित पवारांवर टीका केली होती. शरद पवारांनी राजीनामा दिला त्या दिवशीचे अजित पवारांचे वागणे पाहून शरद पवारांनी त्यांचा निर्णय बदलला असावा. जर खरंच राजीनामा देऊन टाकला तर उद्या अजित पवार आपल्याला सुद्धा गप्प बसवतील या भीतीने शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. असे राज ठाकरे म्हणाले होते.
Uorfi Javed । उर्फी जावेदसोबत सेल्फी काढण्यासाठी मोजावे लागणार पैसे, एका फोटोसाठी किती पैसे?